पुणे – सोन्याची खरेदी (Gold-Silver Price) तीन वेगवेगळ्या कारणास्तवर केली जाते. एक म्हणजे दागिने घडविण्यासाठी, दुसरी खरेदी गुंतवणूक म्हणून आणि तिसरी सट्टेबाजीसाठी. जर तुम्ही दागिने बनविण्यासाठी सोनेखरेदी करणार असाल, तर एक गोष्ट नीट समजून घ्या, सोन्याचा भाव (Gold-Silver Price) फारसा महत्त्वाचा नाही. हौसेला मोल नाही, आज आम्ही तुम्हाला सोने-चांदीचा चालू भाव (Gold-Silver Price) सांगणार आहोत.

आज सोन्याचा दर 50, 247 रुपये प्रति दहा ग्रॅम ने उघडला आहे. त्याच वेळी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 50, 236 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 11 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे.

तथापि, यानंतरही, सोने आजही 5, 953 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56, 200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तर आज चांदीचा दर 172 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात (Gold-Silver Price)  बदल होत असताना त्याचा परिणाम पुण्यातही दिसून येत आहे. आज पुण्यातील 22 कॅरेट सोन्याचा दर भारतीय रुपयामध्ये प्रति 1 ग्रामला 4, 638 रुपये इतका असून,

8 ग्रामला 37, 104 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 1 ग्रामला 5, 059 रुपये इतका असून, 8 ग्रामला 40, 472 रुपये इतका आहे.

तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा वेगाने व्यवहार होत असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेत सोने $3.75 च्या वाढीसह $1,631.25 प्रति औंस दराने व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी $0.05 च्या वाढीसह $18.47 प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.