मद्यपान करीत असताना वाद झाला. त्यात ‘गोल्‍डमॅन’ दत्ता फुगे यांच्या मुलाच्या कानाखाली मारली. मित्रांत झालेला वाद एका मित्राच्या हत्येपर्यंत गेला.

तिघांना अटक

गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा मुलगा शुभमला कानाखाली मारल्यावरुन चौघा मित्रांमध्ये वाद झाला होता. हत्येप्रकरणी शुभम दत्ता फुगे याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

भोसरी परिसरात हा प्रकार घडला. आमच्या भाईला कानाखाली का मारली?” असा सवाल करत तिघांनी आपल्याच मित्राची हत्या केली.

काय आहे प्रकरण?

सोन्याचा शर्ट घेतल्याने चर्चेत आलेले आणि काही वर्षांपूर्वी हत्या झालेले गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या मुलाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

भोसरी परिसरात दोन दिवसांपूर्वी पहाटे अमन सुरेश डांगळे याचा मृतदेह मिळाला होता. हा तपास सुरू असताना पोलिसांनी शुभम फुगे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली.

नेमकं काय घडलं?

अमन आणि तिन्ही आरोपी मित्र होते. दारू पित असताना अमन डांगळे आणि शुभम फुगे यांच्यात वाद झाला. त्यानंतर अमनने शुभमच्या कानाखाली मारली. त्याचा राग आल्याने शुभम आणि त्याच्या दोन साथीदारांनी अमनची हत्या केली.

आमच्या भाईला कानाखाली का मारली? असा सवाल करत तिघांनी अमनची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या तिघांवर आधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

जुलै 2016 मध्ये फुगेची हत्या

सोन्याचा शर्ट परिधान करत असल्यामुळे चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या करण्यात आली. पुण्यात दिघी येथील भारतमाता नगर परिसरात हा प्रकार घडला होता.

पद्धतशीरपणे कट रचून फुगे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांचा मुलगा शुभमने केला होता. शुभमच या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदारही आहे. दत्ता यांची पत्नी सीमा फुगे या माजी नगरसेवक आहेत.

सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे प्रसिद्ध

अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे दत्ता फुगे पिंपरीचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जात होते. सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवून विश्वविक्रम नोंदवल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.