पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानंतर राज्यात बैलगाडा शर्यती (Bulk cart race) सुरु होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नियम व अटी घालून (Terms and conditions) बैलगाडा शर्यतीला परवानगी (Permission) दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) 703 बैलगाडा मालकांनी (Bullock cart owner) शयतीसाठी नोंदणी (Registration) केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बैलगाडाशर्यत प्रेमींमध्ये (Lovers of bullock carts) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Advertisement

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर १ जानेवारीला आंबेगाव (Ambegaon) तालुक्यामधील लांडेवाडी (Landewadi) येथे पहिली बैलगाडा शर्यत होणार आहे.

कोरोना नियमांचे (Corona rules) पालन करून ही शर्यत भरवण्यात येणार आहे. या शर्यतीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona Vaccine) २ डोस ज्यांचे पूर्ण आहेत त्यांनाच या शर्यतीमध्ये सहभाग घेता येणार आहे.

Advertisement

बैलगाडाशर्यतींसाठी बैलगाडी मालकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणीची संख्या पाहता बैलगाडी शर्यत आयोजन करण्यासाठी मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळत आहे.

आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ७०३ बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली आहे. बैलगाडा शर्यतीसाठी घाटांची दुरुस्ती करण्यात येत आहे. शर्यतीवर बंदी असल्यामुळे घाटांची दुरावस्था झाली आहे.

Advertisement