गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणा-या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडत होते. आता मात्र महागाई दरात काहीसी घट झाली असून, त्याचा परिणामा रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणावर होणार आहे.

जून महिन्यात महागाई दरात किरकोळ घट

जून महिन्यात भारताचा किरकोळ चलनवाढ दर 6.26 टक्क्यांवर घसरला आहे. मेच्या तुलनेत यामध्ये थोडा दिलासा मिळाला. किरकोळ महागाई दर मेमध्ये 6.30 टक्के होता.

त्याचबरोबर मे महिन्यात इंडिया औद्योगिक आऊटपूटमध्ये (वार्षिक आधारावर 29.27 टक्के वाढ नोंदली गेली. ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केली आहे.

Advertisement

किरकोळ महागाईचे उद्दिष्ट 4 टक्के

रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाईसाठी 4 टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये दोन टक्क्यांची घसरण आणि वाढ गृहीत धरण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत किरकोळ महागाईने रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या वरच्या क्षेत्राचा टप्पा ओलांडला, तेव्हा सलग दुसऱ्या महिन्यांत ही घटना घडली. त्याआधी सलग पाच महिन्यांपर्यंत किरकोळ चलनवाढीचा दर 6 टक्क्यांच्या आत होता.

पतधोरण बनविण्यासाठी आवश्यक

रिझर्व्ह बँकेला पतधोरण ठरविण्यासाठी किरकोळ चलनवाढीचा डेटा खूप महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन बँक चलनविषयक धोरणाबाबत निर्णय घेते.

Advertisement

रिझर्व्ह बँकेची एमपीसी बैठक गेल्या महिन्यात घेण्यात आली होती, ज्यात सलग सहाव्या वेळी पतधोरण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आहे.

कच्च्या तेलाची वाढ ही चिंतेची बाब

रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षातील महागाईचे लक्ष्य वाढवू शकते. कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे.

एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे, तर दुसरीकडे सरकार कर वाढवित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या क्रूड तेल 75 डॉलरचा टप्पा ओलांडत आहे.

Advertisement

रिफायनरी उत्पादनांमध्ये क्रूड तेलाचा 90 टक्के वाटा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे वाहतूक महागते. त्यामुळे महागाई वाढीला निमंत्रण मिळत असते.

 

Advertisement