पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers Strike) संपावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहेत. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये एस.टी कर्मचाऱ्यांविषयी चर्चा झाली होती. त्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनाही सल्ला दिला आहे. ते म्हणाले शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढे जाऊन संप मिटवा असा सल्ला त्यांनी परब यांना दिला आहे.

Advertisement

गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांनी स्वत: एसटी कर्मचाऱ्यांना भेटावे आणि ठामपणे आश्वासित करावे की बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असेही पडळकर म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले होते की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा.

दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा. त्यांच्यासोबत चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असे आव्हान गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केले आहे.

Advertisement