राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पंतप्रधान कार्यालयात एक तास चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय अन्वयार्थाचे पतं उडायला लागले आहेत. काँग्रेसला वगळून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येण्याची चर्चा सुरू झाली आहे.

राजकारणात काहीही ?

पवार म्हणजे शंका आणि राजकारणात काहीही घडण्याची शक्यता असे मानले जाते. मागच्या वेळी पवार यांनी मोदी यांची भेट घेतली आणि राज्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच आैटघटकेचे सरकार आले.

आताही पवार यांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यांशी एक तास चर्चा केल्यामुळे महाराष्ट्रात वेगळे राजकीय समीकरण तयार होऊन काँग्रेसला वगळून सरकार तयार होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी

या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत हवापाणी आणि गावगप्पा झाल्या असण्याची शक्यताच नाही. त्याशिवाय प्रशासकीय कामांसाठी पवार यांना मोदी यांची भेट घेण्याची गरजच नाही.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीची भेट घेतल्यानंतर पवार यांनी लगेच मोदी यांची भैट घेण्यामागे राजकीय समीकरणे नव्याने जुळविणण्याचा तर प्रयत्न्ही नाही ना, अशी शंका राजकीय तज्ज्ञांना येते.

गेल्या दोन दिवसांत पवार यांच्या पियूष गोयल, राजनाथ सिंह आणि आता मोदी यांच्याशी गाठीभेटी झाल्या. त्यामुळे वेगवेगळे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत.

काय म्हणताहेत राजकीय विश्लेषक ?

पवार पहिल्यांदा पियूष गोयल यांना भेटले आणि त्यानंतर राजनाथ सिंह यांना भेटले. आता त्यानंतर शरद पवार-मोदी भेट झाली. या भेटीला निश्चित राजकीय अंग आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वांत मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत.

त्यामुळे पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते, असे मत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं.

भाजप सत्तेत

महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको. २०२२ मध्ये पाच राज्यांच्या निकालाची वाट पाहण्याची गोष्ट करतात.

महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. पटोले सातत्याने पवारांना लक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसरहित आघाडी महाराष्ट्रात होऊ शकते का, त्यादृष्टीनेही याकडे पाहायला हवं.