सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षण विचारात घेऊन राज्य सरकारने पोलिस भरतीबाबतचा शासन आदेश काढला आहे. डिसेंबरपूर्वी पाच हजार जणांची पोलिसांत भरती करण्यात येणार आहे.

या पदासाठी भरती

शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून 5 जुलै 2021 रोजी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षणाच्या अनुषंगानं धोरणात्मक बाबींचा निर्णय असल्यानं तो गृह विभागांतर्गत पोलिस भरतीसाठी लागू आहे.

पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, कारागृह शिपाई आणि राज्य राखीव पोलिस बल शिपाई भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे.

Advertisement

भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याचे आदेश

या निर्णयाची अंमलबजावणी पोलिस महासंचालकांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असे शासन आदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र पोलिस दलात 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली होती.

पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती करणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने सात हजार पदे भरली जातील.

Advertisement

पोलिस कर्मचाऱ्यांना चांगली घरं

कर्मचाऱ्यांना चांगली घरे आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात याबाबत चर्चा झाली असून, त्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. सर्वसामान्य माणसाला सौजण्याची वागणूक मिळाली पाहिजे.

महिला आणि त्याबाबत घडणारे गुन्हे याबाबत आस्थेवाईकपणे निर्णय घेतले पाहिजेत. दोषींना शिक्षा केली पाहिजे या सूचना दिल्या असल्याचं वळसे पाटील म्हणाले.

 

Advertisement