राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं पाठवूनही त्यावर गेल्या वर्षभरापासून राज्यपाल सही करायला तयार नाहीत. त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपालांवर अप्रत्यक्ष टीका केली.

राज्यपालांना अनेक कामं असतात, त्यामुळं त्यांना सही करायला वेळ मिळत नसेल, अशी कोपरखिळी त्यांनी मारली.

राज्यपाल नियुक्त सदस्यांत शेट्टी यांचेही नाव

राज्यपाल महोदय कामात असतात, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल अशा कडवट शब्दांत शेट्टी यांनी टीका केली.

Advertisement

राज्य सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करायच्या १२ सदस्यांची यादी दिली, त्यात शेट्टी यांचे नाव असल्याची चर्चा आहे; मात्र अनेक महिने झाले, तरी राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करायला तयार नाहीत. याविषयी विचारले असता शेट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजपवरही टीका

साखर आयुक्तांबरोबर भेट झाल्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना शेट्टी यांनी भाजपवरही टीका केली. ज्यांनी जात काढली, त्यांच्याबरोबर शेट्टी जातात, या भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, ‘सत्ता नसल्याने भाजपचे सगळे नेते कासावीस झाले आहेत.

त्यांनी कोणाकोणाची जात काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये.’

Advertisement

पवार यांच्यांशी शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट साखर ऊत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झाली. साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार केला जातो; पण त्यासाठी ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षातही घेतल्या जात नाहीत. याविषयी पवार यांच्याबरोबर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनाही भेटून मागणी केली आहे.

 

Advertisement