File Photo

शिक्रापूर : मालमत्ता, जमीन, शेती आदीसाठी कोण कुठल्या थराला जाईल, याचा भरवसा देता येत नाही. नातीही संपत्तीसाठी संपतात.

घरातील व्यक्तीच एकमेकांच्या जीवावर उठतात. असाच प्रकार शिरूर तालुक्यातील केंदूर येथे घडला.

आजोबा ठार, आजी जखमी

केंदूर (ता.शिरूर) येथील ताथवडेवस्तीत शेतातील वादामुळे नातवाने आजोबाची दांडक्याने मारहाण करून हत्या केली. या मारहाणीत मृत शंकरराव ताथवडे यांच्या पत्नी निर्मला शंकर ताथवडे याही गंभीर जखमी झाल्या आहेत

Advertisement

. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत शंकरराव कृष्णराव ताथवडे (वय ६९)असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी (वय ३६,रा.केंदुर, ता.शिरूर) असे मारहाण केलेल्या आरोपीचे नाव आहे.

काट्या लावल्यामुळे मारहाण

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले, की शेताला काट्या लावता काय, मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही आता तुला खल्लास करणार आहे”

असे म्हणून शंकरराव ताथवडे यांचा नातू (पुतणीचा मुलगा) भरत याने घरी जाऊन आजोबा शंकरराव यांच्या डोक्यात, चेह-यावर, मांडीवर, दगड आणि लाकडी चौरंग, टेबल, फॅनने मारहाण केली.

Advertisement

या घटनेनंतर त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

आरोपी फरार

या मारहाणीत निर्मला शंकर ताथवडे (वय ५५ रा.ताथवडेवस्ती केंदुर, ता.शिरूर) या त्यांच्या पत्नी भांडणे सोडवण्यास गेल्या असता त्यांनादेखील आरोपी याने उजव्या हाताचे दंडावर व डोक्यावर मारहाण केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर शिक्रापूर पोलिस घटनास्थळी पोहचले असता आरोपी भरत हा फरार झाला.

Advertisement