Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

एक्सप्रेसखाली आजोबांनी मारली उडी..पुढं थरार..वाचले आजोबा

कल्याण रेल्वेस्टेशनच्या फलाट क्रमांक चारवरची मुंबई-बनारस एक्सप्रेस सुरू झाली..तेवढ्यात ८६ वर्षाच्या आजोबांनी मागच्या डब्याखाली स्वतःला झोकून त्यांचा जीव जाणार म्हणून सर्वंच हळहळ व्यक्त करायला लागले.

लोको पायलटच्या ही बाब लक्षात आली…तातडीच्या दोन्ही ब्रेकचा वापर करण्यात आला. गाडी जाग्यावर थांबली. आजोबाचा जीव वाचला..

रेल्वेसमोर थरार

मुंबई-बनारस एक्स्प्रेस रेल्वेसमोर थरार पाहायला मिळाला. एक्स्प्रेस सुरू होताच एका 86 वर्षीय आजोबांनी ट्रेनसमोर उडी घेतली. यानंतर एकच गोंधळ उडाला.

Advertisement

रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत सतर्कता बाळगल्यानं आजोबा वाचले. या कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत या आजोबांना रेल्वेखाली जाण्यापासून रोखलं.

या कामात लोको पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक लोको पायलट रवी शंकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

नेमकं काय घडलं?

हरीप्रसाद कर्ण नावाचे 86 वर्षीय आजोबा हे आडीवली ढोकली परिसरात राहतात. त्यांच्या राहत्या घरी पाणी नव्हते.

Advertisement

त्यामुळे पाणी आणून देण्यासाठी त्यांनी आपल्या नातीला सांगितले; मात्र नातीने पाणी देण्यास नकार देत “बाबा तुमचा दुसरा मुलगा पण आहे.

तुम्ही तिकडेही जाऊ शकता,” असे सांगितले. त्यानंतर वृद्ध हरीप्रसाद कर्ण रागावले. त्यानंतर ते त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या घरी गेले; मात्र या ठिकाणीसुद्धा आजोबांचे बिनसले.

नेमका काय घटनाक्रम झाला याचे तपशील समोर आले नाहीत; मात्र दोन्ही मुलांकडे निराशा झाल्यानं संतापलेले आजोबा रागाच्या भरात कल्याण रेल्वे स्थानकात आले.

Advertisement

आजोबांना कसं वाचवलं?

रेल्वस्थानकावर आल्यानंतर आजोबा फलाट क्रमांक चारवर मुंबई-बनारस एक्स्प्रेस या रेल्वेजवळ आले. ही गाडी सुरू होताच आजोबांनी ट्रेनसमोर खाली उतरले.

हे सगळं काही अचानकपणे घडल्यामुळे लोको पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक लोको पायलट रवी शंकर काहीसे गोंधळले; मात्र यांच्या सर्तकतेमुळे आजोबांचे प्राण वाचले. दोन्ही लोको पायलट आणि निरीक्षकांना रेल्वेच्या वरिष्ठांनी बक्षीस जाहीर केलं.

 

Advertisement
Leave a comment