पुणे : भाजप (BJP) नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamathe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाचे कौतुकाचे बॅनर लावले आहेत. यामुळे शहरात सर्वत्र या बँनरबाजीविषयी चर्चा रंगत आहेत.

तुषार कामठे हे पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) पिंपळे निलख भाजप नगरसेवक आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील (PCMC) विविध कामांचे ठेके मिळवण्यासाठी कंत्राटदारांकडून देण्यात आलेली बँक गँरंटी बोगस निघाले होते.

या प्रकरणात कामठे यांनी लक्ष घातले होते. या विरोधात त्यांनी पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभेत आवाज उठवला होता. परंतु या प्रकरणात काहीच हालचाली न झाल्यामुळे त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती.

Advertisement

त्यानंतर अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष ठेवून संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तुषार कामठे यांनी अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर लावले आहेत.

त्यांनी या बँनरवर “आपण आज दाकवून दिले जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे मग तो भ्रष्टाचारी कोणी का असेना. अजित पवार यांच्या नि:पक्षपाती निर्णयामुळे ‘सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट’ या घोटाळेबाज कंपनीवर कुन्हा दाखल झाला आहे. त्याबद्दल दादा आपले मनस्वी आभार, असे तुषार कामठे म्हणाले आहेत.

तसेच अजित पवार यांच्या या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडकर मधील करदात्याचे ५५ कोटी वाचवले. नि:पक्षपाती निर्णयामुळे सिक्युअर आय़टी फॅसिलिटी मॅनेजमेंट या घोटाळेबाज कंपनीवर गुन्हा दाखल झाला.असेही लिहिण्यात आले आहे.

Advertisement