ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळविणा-यांना दोन लाखांचे अनुदान

राज्य सरकार आदिवासी, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवित असते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यापुढे पाऊल टाकीत दहावीत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली.

उत्पन्नाची अट

अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दोन लाखांचे अनुदान मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी आणि १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

हे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ‘बार्टी’ मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा मुंडे यांनी केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

व्यावसायिक पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त

अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना सीईटी, जेईई, नीट यांसारख्या व्यावसायिक अभयसक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे.

याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या नियामक मंडळाच्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गरीबांना फायदेशीर

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे.

या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निश्चितच ही योजना सफल करू, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

You might also like
2 li