file photo

मुंबई: गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या बँकांचा ससेमिरा चुकविणा-या उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची दिवाळखोरीतील कंपनी विकत घेण्याची तयारी एका कंपनीने दाखविली आहे.

दोन हजार नऊशे कोटींचा व्यवहार

कर्जाच्या प्रचंड बोझ्यामुळे अंबानी अडचणीत सापडले होते. रिलायन्स समूहातील रिलायन्स होम फायनान्स ही दिवाळखोरीत निघालेली कंपनी विकत घेण्यासाठी एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड तयार झाली आहे.

हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून रिलायन्स होम फायनान्ससाठी एथॅम इन्व्हेस्टमेंट तब्बल दोन हजार नऊशे कोटी रुपये मोजणार आहे.

Advertisement

कर्जाचा बोजा कमी होणार

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा व्यवहार पार पडल्यास बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला दोन हजार ५८७ कोटी रुपये मिळतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड सुरुवातीला नव्वद टक्के म्हणजे दोन हजार ५८७ कोटी रुपये जमा करील.

त्यानंतर उर्वरित तीनशे कोटींची रक्कम वर्षभरात टप्प्याटप्याने जमा केली जाईल.
या व्यवहारामुळे रिलायन्स समूहावरील कर्जाचा बोझा ११ हजार दोनशे कोटी रुपयांनी कमी होणार आहे. रिलायन्स कॅपिटलची हिस्सेदारी २५ टक्क्यांनी कमी होणार आहे.

Advertisement

दीड हजार कोटींचे नेटवर्थ

अनेक बड्या कंपन्यांनी रिलायन्स होम फायनान्स विकत घेण्यासाठी बोली लावली होती. एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड ही बिगरबँकिंग वित्तीय संस्था आहे.

गेल्या १५ वर्षापासून ही कंपनी या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीचे नेटवर्थ दीड हजार कोटींच्या आसपास आहे.

Advertisement