Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा !

अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी आणि ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी आता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी विभागाच्या निर्णयाबाबत माहिती दिली. या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये खोली भाडे, पाणी, वीज इत्यादी सुविधांचे शुल्क पूर्णपणे माफ असेल, असे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये इतकी होती. पण आता ही मर्यादा वाढवल्याने ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामधील विविध सुविधा विनाशुल्क उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

कुटुंबाचे उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले विद्यार्थीही वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असून त्यांना मोफत दरात या सुविधा देण्यात येतील, असे मंत्री मलिक यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Leave a comment