पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी तीन-चार तास लागतात; परंतु आपत्कालीन परिस्थिती असेल, तर पोलिस ग्रीन काॅरिडाॅर तयार करून असाध्य ते साध्य करून दाखवितात.

तसा अनुभव एका रुग्णाला आला. अवघ्या 83 मिनिटांत पुण्याहून मुंबईला हृदय पोचवून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून एका रुग्णाला जीवदान देण्यात आलं.

दीड तासात गुंतागुतींची शस्त्रक्रिया

ग्रीन कॉरिडॉरच्या साह्याने अवघ्या 83 मिनिटांत पुण्याहून नवी मुंबईला मानवी हृदय पोहोचवण्यात आलं. त्यामुळे बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला नवजीवन मिळालं आहे.

Advertisement

संबंधित रुग्णावर दीड तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत मानवी हृदयाचं प्रत्यारोपण करण्यात आलं आहे; पण वेळेवर मानवी हृदय पुण्याहून मुंबईला पोहोचवल्यामुळे संबंधित रुग्णाचा जीव वाचला आहे.

ब्रेन ड्रेन महिलेचे हृदय व यकृत दान

मुंबईतील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय रवी शर्मन अहिरवार या तरुणावर बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला हृदय प्रत्यारोपणाची तातडीची गरज होती; पण मानवी हृदय दान करणारा व्यक्ती मिळत नव्हता.

दरम्यान पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात एका महिलेला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आलं होतं. संबंधित महिलेचे हृदय आणि यकृत दान करण्यात आलं होतं.

Advertisement

पुण्यात यकृत, मुंबईत हृदय प्रत्यारोपण

पुण्यातील अन्य एका रुग्णामध्ये महिलेच्या यकृताचं प्रत्यारोपण करण्यात आलं. तर बेलापूर याठिकाणी उपचार घेणाऱ्या रवी अहिरवार या तरुणाला मानवी हृदयाची आवश्यकता असल्याची माहिती समोर आली.

त्यामुळे पुण्यातील महिलेचं हृदय लवकरात लवकर नवी मुंबईला पोहोचवणं गरजेचं बनलं; पण पुण्यातील जहाँगीर रुग्णालयापासून बेलापूर येथील अपोलो रुग्णालयापर्यंतचा प्रवास किमान तीन ते चार तासांचा होता.

त्यामुळे पुण्यातील हृदय बेलापूरला पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. अवघ्या 83 मिनिटांत पुण्यातून बेलापूर याठिकाणी मानवी हृदय पोहोचवण्यात आलं आहे.

Advertisement

याठिकाणी अपोलो रुग्णालयात रवी अहिरवार यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर रवी अहिरवार यांना नवजीवन मिळालं. केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत हृदय मुंबईत पोहोचवल्यानं हे शक्य झालं आहे.

 

Advertisement