मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, ही उलथापालथ झाल्यानंतर देखील शिंदे गटाचे समर्थक सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.

नुकतंच, शिंदे गटाचे समर्थक आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव (Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

“32 वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत.” असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले आहेत.

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) पुढे म्हणाले, “अली बाबा और उसके चालीस चोर थे, तसं आम्हीही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत!’ असंही ते म्हणालेत.

शिवसेना आणि शिंदेगटात मोठ्या प्रमाणावर दुफळी निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की तेरा क्या होगा कालिया? मात्र आहे आमचा गब्बर आहे,’ असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं.

“मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं.

ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत! या शब्दात इतिहास लिहिला जाईल.’ असंही पाटील म्हणालेत.