सातारा : ह.भ.प. बंडातात्या कराडकरांनी (Bandatatya Karadkar) वाईनच्या Wine) निर्णयावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना ढवळ्या व पवळ्याची उपमा देत टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Goverment) वाईन (Wine) विक्रीसाठी दुकानात परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेकांनी याविषयीचे चांगले वाईट शब्द सरकारला ऐकवले आहेत. त्यात आता बंडातात्या महाराजांची भर पडली आहे.

सातारमध्ये (Satara) बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे ‘दंडवत आणि दंडूका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला.

Advertisement

तसेच यावेळी बंडातात्या कराडकर यांनी म्हटले की, ”मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पूर्वी तसे नव्हते मात्र आता या महाविकास आघाडीत आल्यामुळे ते बिघडले.” कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ढवळ्या आणि पोवळ्याची उपमा दिली आहे.

ह.भ.प. बंडातात्या कराडकरांनी केलेल्या या विधानावर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काय प्रतिउत्तर मिळेल, व या उपमेला महाविकास आघाडी किती मनावर घेते हे लवकरच समजणार आहे.

Advertisement