पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागवली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

मात्र, अश्यातच शहरात काही ठिकाणी गंभीर घटना देखील घडल्याचं पाहायला मिळालं. ऐन दिवाळीच्या दरम्यान सोसायटीच्या (society) आवारात फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादातून ज्येष्ठ महिलेसह दोघांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.

हडपसर (hadapsar) भागात ही घटना घडली असून, या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोट्या पवार, राहुल पवार, सौरभ सकट (तिघे रा. नाईकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे.

याबाबत मयूर सतीश गायकवाड (वय २२, रा. नाईकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयूर आणि आरोपी गोट्या, राहुल, सौरभ एकाच सोसायटीत राहायला आहे.

फटाके फोडण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या कारणावरुन मयूर, त्याचे काका किरण आणि आजी उषा यांना आरोपींनी मारहाण करुन शिवीगाळ केली. या घटनेचा तपस सहायक फौजदार शिंदे करत आहेत.