पुणे – पुण्यातील हडपसर (​Hadapsar Fire) परिसर एक मोठी दुर्घटना घडली असून, संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथील हॉटेल तिरुमला भवन येथे मध्यरात्री सिलेंडरचा (cylinder) स्फोट (​Hadapsar Fire) झाल्याची घटना (Pune Accident) घडली आहे. काल मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

वर्दी मिळताच अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यावेळी किचनमधील एक स्फोट झालेला सिलेंडर बाहेर काढत इतर सहा सिलेंडर (cylinder) ही सुरक्षित ठिकाणी हलविले व होज पाईपचा वापर करीत पाणी मारुन आगीवर पाचच मिनिटात नियंत्रण मिळवले.

दरम्यान, या घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किचनमध्ये अचानकपणे गॅस लिकेज झाल्याने मोठा स्फोट झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचत सहा सिलेंडर तत्परतेने सुरक्षित ठिकाणी हलविल्याने मोठा (​Hadapsar Fire) अनर्थ टळला. हॉटेलमधील टेबल, खुर्ची, इलेक्ट्रीक वायरिंग व अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

या कामगिरीत हडपसर अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहन चालक सुखराज दाभाडे, फायरमन गणेश पवळ, बापुसाहेब अढाळगे व मदतनीस अनिकेत तारू, नितेश डगळे यांनी सहभाग घेतला.

मात्र, अग्निशन दलाच्या जवनांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे हॉटेल मालकाचं फार नुकसान झालं नाही. दरम्यान, सध्या सिंलेडर (cylinder) लिक होऊन स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आठ दिवसांपूर्वी घरगुती सिलेंडरमधून वायू गळती झाल्याने स्फोट होत आग लागल्याची घटना घडली होती.