file photo

पुणे: आपल्या मागण्यांसाठी आंदोलक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवितात. आंदोलन लक्षवेधी होण्यासाठी प्रयत्न करतात.

तमिळनाडूच्या शेतक-यांनी अर्धनग्न आंदोलन केल्यानंतर आता त्याचे अनुकरण अन्य आंदोलकही करायला लागले आहेत. पुण्यात रिक्षाचालकांनी असे अर्धनग्न आंदोलन केले.

ठराविक कंपन्यांच्या रिफ्लेक्टर्सची सक्ती

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पाठीमागे लावण्यात येणारे रिफ्लेक्टर रिक्षांनादेखील अनिवार्य करण्यात आले. शिवाय यासाठी नामनिर्देशित कंपन्याचेच रिफ्लेक्टर लावणे हे सक्तीचे करण्यात आले.

Advertisement

त्यामुळे त्याचे वाढलेले दर, रिक्षासाठी २ मीटर टेप ठीक असताना क्यूआर कोडसाठी त्यांना १० मीटरचीच खरेदी विनाकारण करावी लागत आहे.

त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने आरटीओ कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले.

दहापट दंडामुळे नाराजी

या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले. आक्रमक झालेल्या रिक्षाचालकांनी अजित शिंदे यांची बनियनवर येऊ नका ही विनंती धुडकावत निवेदन दिले.

Advertisement

रिफ्लेक्टर खरेदी केल्यानंतर हा क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र विक्रेत्याने वाहनाच्या मालकाला द्यायचे आहे.

रिफ्लेक्टर लावलेले नसतील व प्रमाणपत्र नसेल तर त्या वाहनाचे पासिंग होणार नाही. पूर्वी यासाठी केवळ शंभर रुपये लागायचे. आता त्यासाठी एक हजार मोजावे लागत आहे.

Advertisement