पुणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात शनिवारपासून झाली. अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये ठिकठिकाणी तिरंगा यात्रासुद्धा काढली जात आहे. मोठ्या संख्येने नागरिक या अभियानात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. आणि त्यामुळेच आता गरिबाची झोपडी असो की श्रीमंताचा बंगला, कर्मचाऱ्याचे क्वार्टर असो की फ्लॅट स्कीम; नजर फिरेल तेथे थाटात आपला राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ (Har Ghar Tiranga) फडकत आहे..!

शहरातील रस्ते, चौक सजले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक उत्साही माहौल शहरभर दिसून येत आहे. हातात राष्ट्रध्वज घेऊन तिरंगा यात्रा निघत असून, “भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्च्या’ जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमत आहे.

दरम्यान, असे असले तरी पुणे (pune) शहरातील रस्त्याच्या बाजूला गेटवर लावलेले झेंडे संभाजी ब्रिगेडनं (Sambhaji Briged) काढण्यास सुरवात केली आहे.

होय, कारण महापालिकेच्यावतीने देण्यात आलेले झेंडे हे चुकीच्या पद्धतीने प्रिंट झाले आहेत. झेंड्यामध्ये रंग वेगवेगळे आहेत तर मधोमध असलेले अशोक चक्रही तिरपे झाले आहे.

हा राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याने अस्ताव्यस्त ठिकाणचे झेंडे काढण्यास संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Briged) पुण्यात (pune) सुरवात केली आहे.

शिवाय राष्ट्रध्वजाचा अवमान करु नका असे म्हणत जिथे चुकीच्या पद्धतीने झेंड लावण्यात आले ते इतरांनीही काढावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) या अभिनव उपक्रमातून राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण व्हावे अशी या मागची भावना असली तरी महापालिकेने वाटप केलेले झेंडे हे चुकीच्या पद्धतीने छापण्यात आले आहेत.

शिवाय कालपासून या उपक्रमाला सुरवात झाली असून शहरातील विविध भागात असेच झेंड लावण्यात आले आहेत. उपक्रम चांगला असला तरी यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे.

त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान करू नका संभाजी ब्रिगेडनं महापालिका आणि पोलीस प्रशासनाला दिले आहे. शिवाय शहरात असे झेंडे लावण्यात आले असले तरी ते काढून घेण्याचेही आवाहन संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Briged) केले आहे.