पुणे – सध्या “हर हर महादेव’ (har har mahadev) या चित्रपटावरून चांगलेच वाद होताना दिसून येत आहे. या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील चांगलाच वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) या चित्रपटाचा (har har mahadev) मोफत शो ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं होत.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर आता बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज समोर आले आहेत. नुकतंच त्यांनी माध्यमांसमोर त्यांची स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी चित्रपटातील काही गोष्टींवर आक्षेप देखील घेतल्याचं दिसून आलं.

बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्यातील युद्धाचा प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आलाय. तसेच चित्रपटातील इतरही अनेक मुद्द्यांवरून यावेळी आक्षेप घेण्यात आलाय.

रुपाली देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘ बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) हे भोर जवळच्या सुभेदार वाडी शिंद या गावचे रहिवासी होते. पुण्यापासून ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. मूळ आडनाव प्रधान.

सीकेपी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सीकेपी ज्ञातीचा इतिहास आहे. क्षत्रियांना शोभेल असा पराक्रम बाजीप्रभू यांनी केलेला आहे.

हर हर महादेव चित्रपटावरील आक्षेप, प्रतिक्रिया आम्ही पाहिल्या. स्वतः चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही आक्षेप मांडत आहोत, असे रुपाली पाटील म्हणाल्या.

‘या’ मुद्द्यांवर घेतला आक्षेप..!

१. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. बाजीप्रभू देशपांडे यांच्या तोंडून शिवाजी हा एकेरी उल्लेख वारंवार दाखवण्यात आलाय. ही अत्यंत खटकणारी गोष्ट आहे. ते तसा उल्लेख टाळू शकले असते.

२. हिरडस मावळ येथील समुद्र किनारा दाखवला आहे. प्रत्यक्षात तिथे शिरवळला नीरा नदी आहे. आपल्या महाराष्ट्रीयन मुलींना इंग्रज घेऊन जात आहेत, असं दाखवलंय.

३. त्या काळात खरच मावळमध्ये इंग्रजांचं प्राबल्य इतकं होतं का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आम्हीही इतिहास तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांचंही हेच मत आहे.

४. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे हे सख्खे भाऊ. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली एक तंटा दाखवलं आहे. फुलाजी प्रभूंनी विश्वासघात केल्याचं म्हटलंय. यामुळे फुलाजी प्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली गेली आहे. हे दोघेही बंधू स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले.

५. सिनेमॅटिक लिबर्टी असावी. काल्पनिक कथेत ती असते. पण ऐतिहासिक गोष्टी बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे चुकीचं आहे. त्यामुळे अनेक चित्रपट काढणाऱ्यांनाही संभ्रम होऊ शकतो. असं त्यांनी म्हणाल्या.