इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इंदापूर (Indapur) तालुक्याच्या विकासावरून त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी पक्षामध्ये किंवा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये वाद सुरु असतात. काही वेळा तर हे वाद वरिष्ठापर्यंत पोहोचत असतात.
विकासकामांच्या श्रेयावरूनच दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) हे गेली सात वर्षे झाले निवांत (Sleeping) आहेत, त्यांनी असेच निवांत रहावे.
आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय घेऊ नये, इंदापूर तालुक्याचा विकास करणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही, उगाच आम्ही केलेल्या विकास कामांचे श्रेय घेऊ नये, त्यामुळे यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे असे म्हणत भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणच्या विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना भरणे म्हणाले, पुणे जिल्हा नियोजन समिती चे अध्यक्ष पालकमंत्री अजित पवार आहेत, त्याचे सदस्य मी स्वतः, सचिन सपकल, वैशाली पाटील हे आम्ही आहोत, एखाद्या सदस्यांनी मागणी केल्यानंतर तो विकास निधीं आम्ही मंजूर करतो.
तुमचा काहीच अधिकार नसताना तुम्ही नियोजन मंडळाचे सदस्यही नसताना तुम्ही आमच्या विकास कामाचे श्रेय का लाटता? असा सवालही दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केला आहे.