मुंबई : एसटी संपावरून (ST Strike) राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहेत. त्यातच आता भाजपचे (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उडी घेतल्याचे दिसत आहे.

राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एस टी संपाबाबत बैठक घेतली होती त्यावरूनच राम कदम यांनी निशाणा साधला आहे.

पवार अशा बैठक कशा धेऊ शकतात तसच सीएम ठाकरे बैठकीस उपस्थितीत नव्हते. ”मुख्यमंत्री पदाचा पदभार शरद पवार यांना दिला का”? असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थितीत केला आहे.

Advertisement

गेली काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी कर्मचारी (ST staff) काही मागण्यांवर ठाम आहेत. ते काही माघार घेताना दिसत नाहीत. प्रशासनाने अनेक पर्यायी मार्ग काढले होते. मात्र, एसटी कर्मचारी माघार घेयला तयार नाहीत.

काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर काही कर्मचारी अजूनही त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे ते कामावर रुजू झालेले नाहीत. या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार वर टीका केली जात आहे.

Advertisement