मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) पापाराझीसोबतच लोकांचीही आवडती आहे. नुकतीच ही अभिनेत्री मुंबईच्या वर्सोवा परिसरात दिसली. तिचा आगामी चित्रपट ‘गॅसलाइट’चा हिरो विक्रांत मॅसीसोबत ती येथे पोहोचली. यादरम्यान साराचा लूक चाहत्यांना खूप भावला. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, फॅन्स देखील लाईक्स आणि कमेंट करत आहेत.

सारा अली खानने (Sara Ali Khan) अल्पावधीतच तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग केली आहे. सारा अली खान तिच्या कॅज्युअल आणि आरामदायक पोशाखात खूपच मस्त दिसत होती. तिचा सर्टोरियल आउटफिट सगळ्यांनाच आवडला आहे.

साराने रंगीबेरंगी ब्लॅक जॅकेटसह मॅचिंग सायकलिंग शॉर्ट्स परिधान केले होते. हातात कॉफीचा मग घेऊन सारा खूपच गोंडस दिसत होती. बांधलेले केस आणि मेकअप नसलेला लूक साराला शोभत होता.

त्याचवेळी सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विक्रांत मॅसी यांच्या ‘गॅसलाइट’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर दोघेही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा आणि विक्रांतशिवाय या चित्रपटात चित्रांगदा सिंह देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय सारा अली खान विकी कौशलसोबत एका अनटाइटल्ड सिनेमात काम करत आहे.

काही काळापूर्वी या दोघांनी इंदूरमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. इंदूरच्या रस्त्यांवरील विकी आणि साराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.