Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

उसने पैसे परत मागितल्याने फोडले आजोबांचे डोके

उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्याकारणावरून नातवाने आजोबांना शिवीगाळ करतलाथाबुक्कयांनी मारहाण केली. तसेच कठीण वस्तूडोक्यात मारून डोके फोडले.

या प्रकरणी गुरूवारी(दि.२३) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला. माणिकराव नरसिंगराव कळसे(वय ७६, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी)असे जखमी आजोबांचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांनीएमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अमोल गोविंद कळसे असे गुन्हा दाखल झालेल्या नातवाचेनाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

Advertisement

फिर्यादीमाणिकराव यांनी त्यांचा मोठा मुलगा गोविंद याला उसनेपैसे दिले होते. ते पैसे माणिकराव यांनी गोविंदला परतमागितले.या कारणावरून नातू अमोल याने माणिकरावयांना वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्कयांनी मारहाणकेली. त्यानंतर अमोल याने आजोबा माणिकराव यांच्याडोक्‍यात लोखंडी कठीण वस्तूने मारले.

 

Advertisement
Leave a comment