मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामध्ये एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र सुरु आहे. किरीट सोमय्या आज १९ बंगल्यांच्या माहितीसाठी आज कोर्लई गावात (Korlai Village) गेले आहेत.
किरीट सोमय्या आणखी कोणती माहिती समोर आणणार हे पाहणे महत्वाचे आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर पुन्हा एकदा वेडा माणूस म्हणत जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, कोण आहे किरीट सोमय्या? (kirit somaiya) सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात (Jail) जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे.
तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही. लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल. तो पुढे लोक मागे. तो पुढे लोक मागे अशी त्याची अवस्था होईल. सोडून द्या.
वेट अँड वॉच. तो कुठे जात आहे? बंगले शोधणार आणि घरे शोधणार, असा सवाल करतानाच भाजपच्या लोकांना भुताटकीने झपाटलं आहे. त्यांनाही स्वप्नात बंगले दिसत आहेत अशी टीका करत संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग केली आहे.
किरीट सोमय्या कोर्लई गावात जाणार आहेत. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. बंगले अदृश्य झालेत का? आम्हीही विचारतोय बंगले कुठे आहेत? सोमय्याच्या स्वप्नात बंगले येतात, वेडा झालाय तो.
त्याला स्वत:चे बंगले स्वप्नात दिसत आहेत. त्याची बेनामी प्रॉपर्टी कुठे असेल तर ते त्याला दिसत आहे. कागदपत्रे सरपंचांनी दिले आहेत. त्या जमिनीवर एकही बंगला नाही.
बांधकाम नाही. याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भुताटकीने झपाटले आहे.
त्यांच्या स्वत:च्या बेनामी प्रॉपर्टी स्वप्नात दिसतात आणि दुसऱ्यांच्या म्हणून बोंबलतात अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.