दारूच्या व्यसनापोटी वाहने चोरणा-या एका सराईत वाहन चोरट्याला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तब्बल एक कोटी एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोराकडून जप्त करण्यात आला आहे. सुनील वामन महाजन असे अटक केलेल्या 52 वर्षीय सराईत वाहन चोराचे नाव आहे.

काय आहे प्रकरण ?

या वाहन चोराकडून 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या आणि त्याची वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई करत तीन ट्रॅव्हल्स बसदेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दारूच्या व्यसनापोटी महाजन वाहन चोरी करत असल्याची माहिती तपासात उघड झाली झाली आहे.

Advertisement

14 वाहन चोरीचे गुन्हे उघड

या कारवाईमध्ये एकूण एक कोटी एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामुळे 14 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

गुन्ह्यातील एक वाहन चोरी करत असतानाची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कैद झाल्याने प्रकरण उघडकीस आले.

सांगलीत बाईक चोर जाळ्यात

घरफोडी, दुचाकी चोरी प्रकरणातील सराईत चोरट्याला सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. आकाश सतीश कवठेकर (वय 24) असे संशयिताचे नाव आहे.

Advertisement

त्याच्याकडून सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, लॅपटॉप असा 2 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुपवाड परिसरातील तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे.

 

Advertisement