पुणे – ‘दुधा’ला (milk) बॉडी बिल्डिंग फूड देखील म्हटले जाते कारण त्यात सर्व प्रकारचे आवश्यक पोषक असतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि अनेक प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारे दूध प्यायला आवडते. काहींना साधे दूध (milk) प्यायला आवडते तर काहींना कस्टर्डसारखे खायचे असते.

काहींना गरम तर काहींना थंड दूध प्यायला आवडतं. तुमच्या आरोग्यासाठी (Health Care Tips) कोणते दूध चांगले आहे थंड किंवा गरम दूध? (milk) चला जाणून घेऊया….

गरम दुधाचे फायदे –
कोमट दूध आणि मध एकत्र प्यायल्याने अँटीबॅक्टेरियलचे काम होते. दुधात मध मिसळून प्यायल्याने सर्दी-खोकला आराम मिळतो. गरम दूध लवकर पचते. यामध्ये लॅक्टियम नावाचे प्रोटीन असते जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

थंडीच्या दिवसात गरम दूध पिऊन तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या वाढवू शकता. हे शरीराला आर्द्रतेपासून वाचवते.

यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते जे झोपायला मदत करते. त्यामुळे जर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल तर कोमट दूध पिऊन या समस्येपासून सुटका मिळू शकते.

थंड दुधाचे फायदे –
थंड दूध प्यायल्याने अॅसिडिटी दूर होते कारण त्यात जास्त कॅल्शियम आढळते, जे शरीरात जास्त अॅसिड तयार होऊ देत नाही. याचे दररोज सेवन केल्याने त्वचा अतिशय चमकदार आणि स्वच्छ होते.

थंड दूध आणि गरम दूध पिल्याने त्वचेवर परिणाम –
दूध थंड असो वा गरम, ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा नेहमी स्वच्छ आणि टोन्ड राहते.