पुणे : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी पेपरफुटीचे (Exam Leak) सत्र सुरु होते. त्यामुळे पुणे पोलिसांची चौकशी (Pune police inquiry) सुरु आहे. अशातच नागपूरमधून (Nagpur) दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पेपर फुटीप्रकरणात पोलिसांना रोज नवनवीन माहिती मिळत आहे. जे या प्रकरणात आरोपी आहेत त्यांच्याकडे पोलिसांना भलेमोठे पैशाचे आणि दागिन्यांचे घबाड मिळत आहे.

आरोग्य भरती प्रक्रियेत (Health recruitment process) सुरुवातीला परीक्षा (Health Department Exam) पुढे ढकलल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

Advertisement

त्यानंतर परीक्षा घेण्यात आली पण पेपर फुटल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना नागपूरमधून अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणात आणखी एक गुन्हा (Crime) दाखल केला आहे. राज्यात आरोग्य भरती गट क चा पेपर फुटला होता.

त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. दोन जणांना नागपूरमधून अटक (Arrest) केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement