शिक्रापूरसह परिसरातील तळेगाव ढमढेरे, कासारी, जातेगाव, करंदी आदी भागात आज शनिवारी (दि.२९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तब्बल दीड तास मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे पुणे नगर महामार्गसह इतर रस्ते, दुकाने आणि शेती पाण्याखाली गेली आहे.

या पावसाचा अनेक वाहनचालकांना मोठा सामना करावा लागला. दिघी परिसरातील जोरदार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. तब्बल पाऊण तास झालेल्या पावसामुळे दिघीतील रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. आज दिवसभर उन्हाचा कडाका जाणवण होता.

सायंकाळी ढग दाटून आल्याने दिघी-भोसरी परिसरात जोराचा पाऊस झाला.यावेळी रोडे हॉस्पिटल समोर पाण्याचे तळे साचले होते. यावेळी रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनांना तारेवरची कसरत करावी लागली. अचानक पावसाला सुरुवात झाली.

Advertisement

पावसाचा आदांज आला नसल्याने अनेक भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने रस्त्याच्या कडेला उघडी ठेवून बाजूला आसरा घेतला. परंतु तब्बल दीड तास मुसळधार पाऊस झाला. या वेळी रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले तर पुणे नगर महामार्ग आणि आजूबाजूचे सर्व रस्ते पूर्णत: पाण्याखाली गेले.

तसेच काही ठिकाणच्या दुकानांमध्ये मोठया प्रमाणत पाणी जाऊन दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसाचा आदांज आला नसल्याने अनेक भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने रस्त्याच्या कडेला उघडी ठेवून बाजूला आसरा घेतला.

परंतु तब्बल दीड तास मुसळधार पाऊस झाला. या वेळी रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले तर पुणे नगर महामार्ग आणि आजूबाजूचे सर्व रस्ते पूर्णत: पाण्याखाली गेले. तसेच काही ठिकाणच्या दुकानांमध्ये मोठया प्रमाणत पाणी जाऊन दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

Advertisement

शिक्रापूर चाकण चौकाजवळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अमृतवेल इंग्लिश मीडियम स्कूल समोर गटार लाईन नाहीशी झाल्याने रस्त्यावर तळे साचले. त्यामुळे अनेक वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढत जावे लागले. दरम्यान,

एका कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कारचे चाक खड्ड्यात आदळले जाऊन कार पाण्यातच बंद पडली. यावेळी कार मधील युवकांनी भर पावसात रस्त्यावर उतरून कार पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न असफल झाला. ट्रकच्या मदतीने सदर युवकांनी कार ओढून पाण्याबाहेर काढली.

Advertisement