Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

हेलिकाॅप्टर कोसळून फ्लाईट इन्स्ट्रक्टर ठार

चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले. घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर महिला पायलट जखमी झाली आहे.

प्रशासन घटनास्थळी

या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, तहसीलदार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले.

पोलिस आणि प्रशासनाने स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात करत जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. या घटनेचे फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत आहेत.

Advertisement

महिला पायलट जखमी

महिलेवर चोपड्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे एनएमआईएमएस अॅकेडमी ऑफ एविएशनचं आहे. दुर्घटनेत ज्या व्यक्तीने जीव गमावला ती व्यक्ती फ्लाइट इन्स्ट्रक्टर होती, तर जखमी महिला ही प्रशिक्षणार्थी पायलट आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी ट्वीटरवर दु:ख व्यक्त केलं आहे.

शिंदे काय म्हणाले?

एनएमआईएमएस अॅकेडमी ऑफ एविएशनच्या एका विमानाच्या दुखद दुर्घटनेची बातमी ऐकून स्तब्ध झालो. घटनास्थळी तपासयंत्रणा पाठवण्यात आली आहे.

Advertisement

दुर्देवाने आपण फ्लाईट इन्स्ट्रक्टरला गमावलं आहे. फ्लाईट इन्स्ट्रक्टरच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. प्रशिक्षक पायलट महिलेची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करतो, असं ज्योतीरादित्य म्हणाले.

 

Advertisement
Leave a comment