Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

नैसर्गिक आपत्तीत मदत करताय? ‘यां’ना तपासा

राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू असून, तेव्हापासून राज्यासह देशभरात टाळेबंदी लागी करण्यात आली. या कालावधीत मदतीच्या बहाण्याने लोकांची फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने तज्ज्ञांचा एक अभ्यास गट तयार केला आहे.

ऑनलाइन सायबर गुन्ह्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणाऱ्या या गटातील तज्ज्ञांना एक नवीन बाब आढळून आली आहे. राज्यात अचानक आलेल्या पुरामुळे सायबर भामट्यांनी गुन्ह्यांची पद्धत बदलल्याचे आढळले आहे.

भामटे, समाजकंटकांकडून गैरफायदा

कोणतीही आपत्ती कोसळली की, ज्याप्रमाणे दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येऊन सढळ हस्ते मदत करतात, त्याचप्रमाणे काही भामटे, समाजकंटक या परिस्थितीचाही पुरेपूर गैरफायदा घेतात.

Advertisement

राज्यात आलेल्या महापुरामुळे काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून त्यांना मदत करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना फसविले जात आहे.

विविध संस्थांच्या नावे समाजमाध्यमांवर जाहिराती करून मदत वस्तू आणि पैशाच्या स्वरूपात स्वीकारली जात असल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

रोख पैसे जमा केले जातात, स्वतःच्या खात्यात

पुरामध्ये झालेली जीवितहानी आणि वित्तहानी याबाबतचे फोटो आणि त्यासोबत सामाजिक संस्थांच्या नावाचा वापर करून वस्तू आणि पैसे स्वीकारले जात आहेत. काही संस्थांच्या नावाचे प्रोफाइल तयार करून ती संस्था आपणच चालवीत असल्याचे भासविले जात आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, यामध्ये पैसे ऑनलाइन स्वीकारण्यासाठी संस्थांच्या ऐवजी वैयक्तिक खात्याचा तपशील दिला जात असल्याचे दिसून आले आहे.

Leave a comment