मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकार प्रत्येकी पाच लाख तर केंद्र सरकारनं प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. मुंबईतील तीनही घटनांबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करण्यात आला.

मुंबईकरांची उडविली झोप

शहराला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. रात्रभर मुंबईत पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. रात्रभर पडलेल्या पावसाने मुंबईकरांची झोप उडवली.

जखमींवर मोफत उपचार

दुर्घटनतील जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

अशाप्रकारच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी इतरत्र राहण्याची सोय करण्यासाठी एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाकडून मदतीची घोषणा

मुंबईत भिंत कोसळून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुबीयांना पंतप्रधान रिलिफ फंडमधून मदत जाहीर करण्यात आली आहे.

मृत्यू पावलेल्यांच्या कुटुबीयांना दोन लाख रुपये, जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे.

जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.