पुणे – जर आपल्या रक्तात हिमोग्लोबिनची (Hemoglobin) कमतरता असेल तर शरीरात अशक्तपणा येतो आणि दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करणे कठीण होते. हिमोग्लोबिन (Hemoglobin) हे लोह-आधारित प्रथिने रक्त पेशींमध्ये असते. जे शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. यासाठी तुम्हाला काही लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे लागेल, तरच हिमोग्लोबिनच्या (Hemoglobin) कमतरतेवर मात करणे शक्य होईल. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी कोणते ड्रायफ्रुट्स (dry fruits) फायदेशीर ठरू शकतात हे जाणून घेऊया.

हिमोग्लोबिन वाढवणारे ड्रायफ्रुट्स :

अक्रोड :
अक्रोड हे एक असे ड्रायफ्रूट आहे ज्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. मूठभर सोललेल्या अक्रोडातून शरीराला सुमारे 0.82 मिलीग्राम लोह मिळते. जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर दररोज अक्रोडाचे सेवन करावे.

पिस्ता :
पिस्त्याची चव अनेकांना त्याकडे आकर्षित करते. मूठभर पिस्त्यामध्ये 1.11 मिलीग्राम लोह असते. नियमित आहारात याचा समावेश केल्यास शरीरात लोहाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

काजू :
अनेक मिठाई आणि पाककृती सजवण्यासाठी काजूचा वापर केला जातो, परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल की मूठभर काजूमध्ये सुमारे 1.89 मिलीग्राम लोह असते. लोह आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे.

बदाम :
मन तीक्ष्ण करण्यासाठी आपण रोज बदाम खावेत असे अनेकदा म्हटले जाते, परंतु जर तुमचे शरीर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्त झाले असेल तर दररोज सकाळी भिजवलेले बदाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.