मुंबई: अनेकांना धुळीची ऍलर्जी असते. त्यामुळे अनेकांना सर्दी, अंगावर पुरळ येणे, दमा आदी आजार होतात. वातावरणातील धूर, वातावरणातील बदल, मायक्रो पार्टिकल्सच्या हवेत असलेल्या जास्त प्रमाणामुले ही ऍलर्जी होत असते.
अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी वारंवार औषधं घेणं हे योग्य नाही. मात्र, नैसर्गिक उपचार करून आपण यावर उपाय करू शकतो.
१) मध: मधामुळे घशातील खवखव आणि श्वसन नलिकेला आलेली सूज ठिक होते. मध एखाद्या ल्युब्रिकंट सारखी घशातील खवखव आणि खोकला बरा करण्याचं काम करतं.
२) दही : अॅलर्जी रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये असंतुलन झाल्यास होते. यासाठी शरीरासाठी चांगले असणारे बॅक्टेरिया आपल्या आतड्यात गेले पाहिजे. हे होण्यासाठी प्रोबायोटिक्स बेस्ट असतात. हे अॅलर्जी बरी करण्यासाठी काम करतात. आतड्यांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीसाठी दही आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ खाणं उत्तम आहे.
३) अँपल व्हिनेगर: एका ग्लास पाण्यामध्ये १ चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि दिवसांतून तीन वेळा त्याचं सेवन करावं. हे पेय कफ बनविण्याची वाढलेली प्रक्रिया धिमी करतात आणि लिम्फॅटिक प्रणाली स्वच्छ करतात.
४) वाफ : वाफ घेणं धुळीच्या अॅलर्जीवर सर्वात उपयुक्त आणि अचूक उपाय आहे. कमीतकमी १० मिनिटे वाफ घ्यावी. वाफेनं कंजेशन दूर होते.
५) व्हिटॅमिन सी: धुळीची जुनाट ऍलर्जी असेल तर व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात घेणे. यासाठी आंबट फळं जसे संत्र आणि लिंबू जे ‘व्हिटॅमिन सी’नं परिपूर्ण आहेत त्यांचं सेवन करावं. व्हिटॅमिन सी नाकातील स्त्राव आणि ब्लॉकेज पण कमी करतं