ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

दोन हजार कोटींचे हेराॅईन जप्त

इराणहून मुंबईमार्गे पंजाबला हेराॅईनची होणारी तस्करी महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) पकडली आहे. दोन हजार कोटी रुपयांचे हेराॅईन जप्त करण्यात आले असून, गेल्या कित्येक वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

तिघांना अटक

या कारवाईमध्ये डीआरआयने तब्बल २९३.८१ किलो हेरॉईन जप्त केले आहे. सध्याच्या बाजारमूल्यानुसार जप्त केलेल्या या हेरॉईनची किंमत तब्बल दोन हजार कोटींच्या घरात आहे. या प्रकरणाशी संबंधित पंजाबमधून एक तर मध्य प्रदेशमधील दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईमार्गे पंजाबमध्ये तस्करी

पंजाबच्या तरणतारण या भागात असलेल्या एका कंपनीद्वारे इराणहून मुंबईमार्गे हेरॉईनची तस्करी केली जात होती, याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

हे हेरॉईन इराणच्या चाबहार बंदरावरून मुंबईमध्ये आणण्यात येणार होते. तसेच मुंबईहून त्याची पंजामध्ये तस्करी केली जाणार होती.

कंटेनरमधून पिशव्या जप्त

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी मुंबईमध्ये आलेल्या दोन कंटेनरची तपासणी केली. तपासणीनंतर या कंटनेमध्ये पांढऱ्या रंगाचे पावडर असलेल्या सहा पिशव्या मिळाल्या.

या पिशव्यांमधील पांढऱ्या पावडरची चाचणी केली असता ते हेरॉईन असल्याचे समजले. या प्रकारानंतर डीआरआयने प्रकरणाच्या खोलात जाण्याचा निर्णय घेतला.

या कारवाईमध्ये तरणतारण येथील संधू एक्सपोर्ट नावाच्या कंपनीचे मालक प्रभजीत सिंह यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणाशी निगडीत आणखी दोघांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे.

अशी केली जात होती तस्करी

भारतात मादक पदार्थांमध्ये हेरॉईनची सर्वात जास्त तस्करी होते. त्यानंतर भांग आणि कोकेन यांची तस्करी केली जाते.

या सर्व पदार्थांच्या वाहतुकीला सध्या बंदी आहे; मात्र असे असले तरी या प्रकरणात सिप्सम स्टोन आणि टॅल्कम पावडरच्या नावाखाली हेरॉईनची तस्करी केली जात होती.

तसेच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ही तस्करी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा सर्व माल जेएनपीटी बंदारवर उतवला जात होता. सध्या उतरवलेले सर्व हेरॉईन हे पंजाबसाठी रवाना होणार होते; मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हा कट उधळून लावला.

 

You might also like
2 li