file photo

नवीदिल्लीः प्रसिद्ध अभिनेत्री फाईव्ह जी’ नेटवर्क’ मुळे प्रदूषण आणि अनेक व्याधी जडत असल्याचा आरोप करीत त्याविरोधात दाखल केलेल्या खटल्यातून न्यायमूर्ती संजीव नरूला बाहेर पडले. त्याचे कारण मात्र त्यांनी दिलेले नाही.

वीस लाखांचा दंड

यापूर्वी जुहीचा याचिका फेटाळून तिला वीस लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता.
जुही चावला हिने दाखल केलेली याचिका मुख्य न्यायधीशांच्या आदेशानुसार अन्य खंडपीठापुढे जाणार आहे. २९ तारखेपर्यंत या याचिकेची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आदेशावर पर्यावरण प्रेमींची टीका

फाईव्ह जी लहरीमुळे आरोग्याला आणि पर्यावरणाला धोका होतो, असा मुद्दा जुही चावला हिने उपस्थित केला होता. न्या. जे. आर. मिढा यांनी यासंबंधीची याचिका फेटाळली होती. तिला वीस लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. त्यावर पर्यावरणप्रेमींनी टीका केली होती.

Advertisement

याचिका फेटाळण्याला आक्षेप

चावला हिच्या वकिलांनी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. ‘सुनावणीच्या टप्प्यापर्यंत अजून न पोचलेली याचिका कायद्यानुसार फेटाळली जाऊ शकत नाही. ती रद्द होऊ शकते,’ असे त्यांनी म्हटले होते.

चावला यांनी वीस लाख रुपयांच्या दंडमाफीसाठी अर्ज केला नाही. ही रक्कम जमा करण्यासाठी तिला न्यायालयाने एक आठवड्याची मुदत दिली. न्यायालयीन फी परत करण्याचा अर्जही चावला यांनी मागे घेतला.

सवंग प्रसिद्धीसाठी याचिका

चावला व इतर दोन जणांद्वारे ‘फाइव्ह जी’ रद्द करण्याच्या मागणीसाठीची दाखल करण्यात आलेली याचिका ही सदोष आणि कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे सांगत केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीची कृती असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

Advertisement

 

 

 

Advertisement