भारती विद्यापीठातील महिला डाॅक्टरांच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये आढळलेल्या छुप्या कॅमे-याची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे.

आरोपीच्या शोधाचे आणि त्याला जामीन मिळणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

महिलांची गंभीर फसवणूक

पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टरांच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

Advertisement

त्यानंतर पीडित महिलेने 6 जुलै 2021 रोजी तक्रार नोंदवली. “पुणे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी.

महिलांच्या रूममध्ये असे कॅमेरे बसवण्याची बाब धक्कादायक आहे. अशाप्रकारे महिलांची होणारी फसवणूक ही गंभीर आहे” असे मत त्यांनी व्यक्त केले.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे ?

अशाच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत, याची माहिती मिळावी, याबाबत पुणे पोलिस आयुक्तांना डाॅ. गोऱ्हे यांनी निवेदन सादर केले आहे.

Advertisement

पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरांना न्याय मिळेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कठोर कारवाई करा

आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये, याची दक्षता घेण्यात यावी. अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याला निश्चितच आळा बसेल, असे डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले. महिलांनीही सजग राहून सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

 

Advertisement