राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने आतापर्यंत काय तपास केला आहे? ते आम्हाला पाहायचे आहे.

म्हणून एक सीलबंद अहवाल सीबीआयनं पुढील सुनावणीला दाखल करावा आणि आम्ही अहवाल पाहून लगेच तुम्हाला परत करू, असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत. या गुन्ह्याच्या फिर्यादीत अद्यात व्यक्ती कोण, असा सवालही उच्च न्यायालयानं केला.

सर्वांची चाैकशी करा

सीलबंद अहवाल दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. सीबीआयनं केवळ देशमुख यांच्या विरोधात तपास न करता संबंधित सर्वांची चौकशी करावी, जे कोणी यामध्ये गुंतलेले आहेत, अशीही सूचनाही सीबीआयला उच्च न्यायालयानं केली आहे.

Advertisement

सीबीआयवर ठपका

सर्वसाधारणपणे चोरीच्या गुन्ह्यात अज्ञात व्यक्ती अशी नोंद केली जाते; पण इथे प्राथमिक चौकशी केलेली आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं.

यावर सीबीआय बुधवारी खुलासा करणार आहे. दरम्यान अनिल देशमुख यांना ईडीनंही समन्स बजावलं असून याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे.

वाझेंना सेवेत घेतलेल्यांची चाैकशी करा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या जाहीर आरोपांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला तपासाचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

सीबीआयनं याप्रकरणी देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे; मात्र हा गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

यावर न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन जे जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

या प्रकरणात ज्या ज्या व्यक्तींची नावं समोर येत आहेत, त्यांचीही चौकशी सीबीआयने करायला हवी, केवळ देशमुख यांचीच चौकशी करता कामा नये.

Advertisement

ज्या समितीनं सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेतलं, त्यांचीही चौकशी करायला हवी, अशी सूचना या वेळी उच्च न्यायालयांन केली.

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ही चौकशी सुरु झाली आहे, त्यामुळे एफआयआरमध्ये म्हटल्याप्रमाणे तपास सर्वांविरोधात व्हायला हवा, असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

Advertisement