हैदराबादच्या डेक्कन चार्जर्स संघाबरोबरचा आयपीएस करार रद्द केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

उच्च न्यायालयाच्या लवादाने ठोठावलेला ४,८०० कोटींचा दंड बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी रद्दबातल ठरवला.बीसीसीआयने १५ सप्टेंबर २०१२ मध्ये प्रशासकीय समितीची तातडीची बैठक बोलावत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या दुसऱ्या हंगामातील विजयी संघ असलेला डेक्कन चार्जर्ससोबतचा करार मोडीत काढला.

आर्थिक व्यवहार योग्यपणे न हाताळण्याचे सबब पुढे करत बीसीसीआयने डेक्कन चार्जर्स संघाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याविरोधात डेक्कन चार्जर्स संघाची मालकी असलेल्या डेक्कन क्रोनिकल या कंपनीने बीसीसीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Advertisement

आपल्याशी १० वर्षांचा करार झालेला असतानाही आयपीएलमधून बेकायदेशीरपणे बाहेर काढण्यात आले आहे, असा आरोप डेक्कन क्रॉनिकल या कंपनीने बीसीसीआयवर केला होता. या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडत असल्याने न्यायालयाने यावर तोडगा म्हणून या प्रकरणासाठी लवाद म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सी. के. ठक्कर यांची नियुक्ती केली होती.

डेक्कन चार्जर्सने याचिकेतून केलेले दावे बीसीसीआयच्या विरोधात गेले आणि त्यानुसार लवादाने बीसीसीआयला ४,८०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आणि त्यासोबतच सप्टेंबर २०२० पर्यंतची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. लवादाच्या या निर्णयाला बीसीसीआयने मुंबई उच्च न्यायालयात याचिकेतमार्फत आव्हान दिले होते.

त्यावर बुधवारी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर व्हीसीमार्फत सुनावसणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय जाहीर करताना न्यायालयाने लवादाने ठोठावलेला ४,८०० कोटींचा दंड रद्दबातल ठरवला.

Advertisement