मुंबई : कर्नाटकमध्ये हिजाब (Karnataka Hijab) घातल्याने मुस्लिम मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला. यामुळे मुस्लिम महिलांकडून हक्कासाठी आंदोलने करण्यात येत आहेत. आणि आता याच वादाचे पडसात मुंबईमध्येही (Mumbai) उमटले आहेत.
कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात (PU College) हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकारामुळे ठाण्यातील मुंब्रा (Mumbra in Thane) येथे मुस्लिम महिलांनी (Muslim Women) विरोध दर्शवला. मुंब्रा येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुणी एकत्र येऊन त्यांनी इंडियन मुस्लिम यूनियनच्या (Indian Muslim Union) बॅनरखाली कर्नाटकातील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
तसेच मुंबईतील मदनपुरा (Madanpura) भागात हिजाबच्या समर्थनात मुस्लिम महिला आणि तरुणींनी सह्यांची मोहीम राबवली आहे. हिजाबचा वाद हा 23 दिवसांपूर्वी सुरु झाला आहे.
शिक्षणमंत्री बी सी नागेश (Education Minister B. C. Nagesh) यांनी सांगितले की, हा वाद सुरु होण्यापूर्वी या महाविद्यालयात येणाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या.
हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला होता. तसेच याविरोधात तरुणींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
यामध्ये त्यांनी आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली आहे.