मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची (10th And 12th students) परीक्षा ऑनलाईन (online Exam) पद्धतीने घेण्यात याव्या यासाठी विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या धारावी (Dharavi) मधील घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी पोलिसांनी (Police) विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज देखील केल्याचे पाहायला मिळाले आहे.

हिंदुस्थानी भाऊच्या सांगण्यावरून या विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना चिथावल्याचा आरोपाखाली धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली आहे.

Advertisement

हिंदुस्थानी भाऊला सकाळी १० वाजता बांद्रा न्यायालयासमोर (Bandra Court) हजर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा हिंदुस्थानी भाऊवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

हिंदुस्थानी भाऊ हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी (Student Protest) उपस्थित होता. तसा हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ ही समोर आला आहे. विद्यार्थ्य़ांना ऑफलाईन परीक्षा (Exams) देण्याची सक्ती का केली जात आहे असा प्रश्न हिंदुस्थानी भाऊने उपस्थित केला आहे.

धारावी पोलीस ठाण्यात हिंदुस्थानी भाऊवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पहाटे तपासणीसाठी नायर रुग्णालयातही नेण्यात आले होते. पोलीस ठाण्याचा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Advertisement