मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊने (Hindusthani Bhau) उर्फ विकास पाठक (Vikas Pathak) याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन (Online Exam) पद्धतीने घेण्यात याव्या यासाठी चिथावणीखोर वक्तव्य आणि विद्यार्थ्यांना भडकावल्या प्रकरणी धारावी पोलिसांनी (Dharavi Police) त्याला अटक केली आहे.

न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला सोडवण्यासाठी आता नवीन फंडा वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

धारावी पोलीस स्टेशन (Dharavi Police Station) मध्ये हिंदुस्थानी भाऊवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर धारावी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांकडून हिंदुस्थानी भाऊची चौकशी सुरु आहे.

Advertisement

काय आहे ऑडिओ क्लिप?

मी अमान बोलतोय ग्रुपचा अॅडमिन. मी वांद्र्यात आलोय. इथे मी चौकशी केली वकिलांकडे इथे भाऊ नाहीत. भाऊना निघून अर्धा ते पाऊण तास झालाय. आता भाऊ धारावीत पोलीस कोठडीत आहेत.

जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जास्तीत जास्त संख्येने धारावीत या. आम्ही पण धारावीत जात आहोत. सर्वात जास्त आम्हाला मुलींची गरज आहे. मुली जास्त असतील तर पोलीस मारणार नाहीत.

Advertisement

तेथे मीडिया पण आहे. आपली मैत्रीण, आपल्या बहिणी सर्वांना घेऊन या. जास्तीत जास्त विद्यार्थांना घेऊन या. कृपया सपोर्ट करा. लवकरात लवकर पोहचा, असे ऑडिओ क्लिपमध्ये आव्हान करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची (10th And 12th students) परीक्षा ऑनलाईन (online Exam) पद्धतीने घेण्यात याव्या यासाठी विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Advertisement

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या धारावी (Dharavi) मधील घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी पोलिसांनी (Police) विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता.

हिंदुस्थानी भाऊच्या सांगण्यावरून या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. विद्यार्थ्यांना चिथावल्याचा आरोपाखाली धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली आहे.

Advertisement