Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

Home Loan at Low Rates : ह्या बँकेचे होम लोन झालेय स्वस्त !

भारतात उत्सवांचा हंगाम सुरू झाला आहे आणि नाशिकमधील ग्राहकांसाठी एक खुशखबर म्हणजे कोटक महिंद्रा बँकेने पुन्हा एकदा त्यांचे गृह कर्जावरील व्याजदर १५ बेसिस पॉइंट्सने (बीपीएस) कमी करत वार्षिक ६.६५% वरून ६.५० टक्क्यांपर्यंत आणले आहेत. (Home Loan at Low Rates)

कोटक गृह कर्ज व्याज दर आता वार्षिक ६.५०% पासून सुरू होतात, जे नाशिकमधील घरखरेदीदारांसाठी उत्तम मूल्य सादर करतात.

हे दर मर्यादित काळासाठी असून ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत लागू असतील.

Advertisement

ताजी गृहकर्जे आणि बॅलेन्स ट्रान्सफर या दोहोंसाठी व्याजदर वार्षिक ६.५०% पासून सुरू होईल.

हा खास व्याजदर सर्व गृह कर्ज रकमांसाठी उपलब्ध असेल आणि ते कर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलला जोडले जातील.

कोटक महिंद्रा बँकेच्या कन्झ्युमर असेट्सचे अध्यक्ष अंबुज चंदना म्हणाले,

Advertisement

“लाखो घरखरेदीदारांच्या उत्सवी उत्साहात भर घालताना आणि त्यांचे स्वतःच्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करताना आम्हाला आनंद होत आहे.

जग बदलत आहे आणि आपण अधिक काळ घरात असतो, आपल्या राहणीमानामध्येही बदल झाला आहे.

लोकांना आता आरामदायी घरे हवी आहेत, ज्यात त्यांचे पूर्ण कुटुंब काम करू शकते,

Advertisement

मनोरंजन करून घेऊ शकते आणि उत्तम प्रकारे एकत्रित वेळ घालवू शकते.

कोटकच्या गृह कर्जावरील अतुलनीय ६.५०% व्याजदरामुळे घर खरेदी करण्याचे स्वप्न आता खिशाला अजूनही परवडणारे होऊ शकते.

Advertisement
Leave a comment