मुंबई : कर्नाटक (Karanataka) राज्यातील शाळा (School) आणि महाविद्यालयात हिजाब (Hijab) प्रकरण चांगलेच पेटले आहे. यावरून महाराष्ट्रातही (Maharashtra) त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. यावरूनच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी राजकीय इशारा जनक सूचना दिल्या आहेत.

कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणामुळे कर्नाटक सरकारला (Karanataka Goverment) २ दिवसांसाठी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावी लागली आहेत. हिजाब घालून मुलींना शाळेमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

हे सर्व प्रकरण पाहता महाराष्ट्रात दंगा होऊ नये म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय पक्षांना तंबी दिली आहे. “परराज्यातल्या एखाद्या मुद्द्यावर आपल्या राज्यातली शांतता बिघडवू नका” असे आव्हान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले की, जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते.

त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

जे मी सामान्य नागरिकांना सांगितले तेच राजकीय पक्षांनाही सांगतो आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये आणि पोलीस विभागाचे काम वाढवू नये असा इशाराही राजकीय पक्षांना दिला आहे.

Advertisement