पुणे : देशात डिझेल (Disel) आणि पेट्रोल (petrol) च्या किमतीं वाढल्यानंतर सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यातील (Pune) घराच्या किमतीं (Home Price) गगनाला भिडल्या आहेत.

पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, रावेत, थेरगाव , ताथवडे येथे टू बीएचके (2BHK) फ्लॅट घेण्यासाठी ८० ते ८५ लाख रुपये मोजावे लागत आहेत. वाढलेली महागाई यामुळे घरच्याही किमतीं वाढलेल्या आहेत.

कोरोनामुळे (Covid-19) सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. याचाच परिणाम हा शहरातील घरच्या किमतींवर झाला आहे. शरच्या मध्यवर्ती ठिकाणी घरच्या किमती या सर्वाधिक आहेत.

Advertisement

डेक्कन , प्रभात रोड , एरंडवणे, तसेच पेठांच्या परिसरातील घराचे दर प्रतिचौरसफूट (Per square foot) सर्वाधिक आहेत. लोहगाव, धानोरी परिसरात घरांच्या किमती सर्वात जास्त असल्याचे आढळून आले आहे.

१ बीएचके फ्लॅटची किंमत ही ४० लाख आहे. डेक्कन 14 ते 16 हजार चौरस फूट, प्रभात रोड – 14 ते 16 हजार चौरस फूट, एरंडवणे- 11 ते 13 हजार चौरस फूट, कोथरूड – 8 ते 15हजार चौरस फूट आहे.

वारजे- 5 ते 7 हजार चौरस फूट, पेठ परिसर- 11 ते 12हजार चौरस फूट , भोसलेनगर – 12 ते 15 हजार चौरस फूट, कर्वेनगर 7 ते 13 हजार चौरस फूट , औंध- 7 ते 10 हजार चौरस फूट, बाणेर-7 ते 10 हजार चौरस फूट, पाषाण 6 ते 8 हजार चौरस फूट , बावधन-6 ते 10 हजार चौरस फूट अशा किमतीं आहेत.

Advertisement