Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

घरोघरी लसीकरण मोहीम पुण्यातून होणार सुरू

घरोघर लसीकरण सुरू होण्याबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने आता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार घरोघरी लसीकरणाची मोहीम पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.

केंद्राच्या परवानगीची वाट नाही पाहणार

‘महाराष्ट्रात लवकरच घरोघरी जाऊन लसीकरण मोहीमेस सुरुवात करणार असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली.

केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही, असंही राज्य सरकारने म्हंटल आहे. राज्यात लसींचा मुबलक पुरवठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहिमेला वेग आला आहे.

लसीकरण केंद्रावर येणे शक्य नसलेल्या ६० वर्षांवरील किंवा अपंग नागरिकांचे घरोघरी अंथरुणाला खिळलेल्या आणि आजारी नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करण्यात येत होती.

नाराजीनंतरचे पाऊल

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. या वेळी घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारचा पाचकलमी कार्यक्रम तयार असताना केंद्र सरकराच्या मंजुरीची गरज काय?

असा प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला होता. केरळ, बिहार, झारखंडने परवानगी घेतली होती का? अशी विचारणा करून अंतिम टप्प्यात माघार घेण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.

तसंच बुधवारी नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात केंद्राच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचं सांगितलं.

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मोहीम राबवली होती, त्याच अनुभवाचा फायदा घेत ही मोहीम राबवली जाईल असं राज्य सरकारने सांगितलं आहे.

Leave a comment