भांडणं कोणत्या थराला जातील, याचा भरवसा देता येत नाही. पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून घरावर पेट्रोल टाकून, एका कुटुंबातील सदस्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे.

तीन जणांना बेड्या

जुन्या भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना पोलिसांना भीती नाही का?

असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी एकजण सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Advertisement

नेमकं प्रकरण काय ?

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील दहाचाळ, राहुल नगर परिसरात तक्रारदार अपेक्षा अहिरे ही विवाहित महिला पती आणि आईसोबत राहते. तक्रारदार महिलेचा भाऊ सतीश कांबळे आणि आरोपी सोमनाथ वाघ यांच्यात जुन्या भांडणाचा राग होता.

याच रागातून आरोपी सोमनाथ वाघ याच्यासह मोन्या आणि कुणाल हे सतीश कांबळे याच्या घरी गेले. त्यांनी सतीशच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावली आणि घरातील सदस्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपींपैकी सोमनाथ वाघ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे

Advertisement