सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही (CM) प्रश्न विचारले आहेत.

राजू शेट्टी म्हणाले, हे सरकार लुटारूच्या पाठिशी उभा आहे. मुख्यमंत्री यांनी किती दिवस लुटारूच्या माघे उभे राहायचे याचा विचार करावा. हे एक तर बेकायदेशीररित्या वागतात.

कारखानदार, साखर आयुक्त त्यांच्यात ताटा खालचे मांजर झाले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) आणि राज्य मंत्री हे दोघे ही बेकायदेशीर ऊसामध्ये कपाती करतात. मग न्याय मागायचा कुठे? असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

Advertisement

ज्या खाजगी वीजनिर्मिती कंपनी आहेत. चांदोलीला आहे, वीरला आहे. त्यांच्यामध्ये पवार कुटुंब चे शेअर्स नाहीत हे अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर करावे.

तेवढे शेअर्स शेतकरी संघटनेला देणगी दिली तरी चालतील. आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने कंपनी चालवू असा घणाघाती टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, पोलिसांच्या दडपशाहीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतोय. पण ही स्वाभिमानीची फौज आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra)  विरोधीपक्षाची फौज नाही. हे लक्षात ठेवावे.

Advertisement

आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत आणि आम्ही सांगितलेले आहे. संघर्षच करायचा असेल तर तारीख ठरवून करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.